Creativity and Innovation

Just another WordPress.com weblog


Leave a comment

बघ माझी आठवण येते का

बघ माझी आठवण येते का

मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?

गीतकार :सौमित्र चित्रपट :गारवा

Advertisements


Leave a comment

खारट कॉफी….

त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे

खुपजण होते. ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी

वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.

तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या ‘कॉमनमॅन’ सारखा. त्याला तर त्याचे

मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या

अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत.

आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!

पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, ‘तु

पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?’ तिला ‘नाही’ म्हणणं

फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि

आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, ‘हो’ म्हणावसं वाटलं. ती ‘हो’

म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच

केला नव्हता!

जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर

दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता.

आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला

हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!

कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक

मारली. वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला,

‘थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!’ सारं कॉफी शॉप या अनपेक्षित

मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले.

तीसुध्दा!

वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना – “कैसे कैसे लोग आते है!”

अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ

लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क

मीठ! अखेरीस तिनं विचारलंच “पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?”

“माझं लहानपण समुद्रकाठी गेलं…” शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला…

“सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची,

तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं

बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं

घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या

आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते…” भरलेल्या

डोळ्यांनी तो म्हणाला.

तिचं ह्र्दय भरून आलं – त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं

मन. मग तीही बोलली… आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल… तिच्या

स्वप्नांबद्दल… खरचं खुप छान डेट झाली ती!

मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले. अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो

शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके

दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि

दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप

सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि हो,

त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची

त्या कॉफीत! अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके

रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी…! काही दिवसांनी ती

सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं

पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली.

त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.

“माझ्या प्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी

तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य

मी तुझ्याशी बोललो… पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत

राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही… केवळ तु

मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!

प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला

कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती!

त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ

मागितलं वेटरकडे. आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी

ते तसंच पुढे चालवून घेतलं…

खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती! पण मला तु खुप आवडतेस…

आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो. …आता

मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं

ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज – मला माफ करशील?”

लेखक
Unknown


Leave a comment

‘बाटा’ रुते कुणाला…

‘बाटा’ रुते कुणाला,
आक्रंदतो इथे मी,
मज बूट हे रुतावे,
हा दैवयोग आहे!
(आहे वर तान घ्यावी,
नाहीतर बूट चावतो आहे
हे लक्षात कसे येणार?)
रुते कुणाला….!

सांगु कशी कुणाला,
कळ हाय अंगठ्याची,
हे बूट घालता मी,
अस्वस्थ फार आहे!
(आ.व.ता.घ्या.)
रुते कुणाला….!

चांभार हाय वैरी,
असतो कुठे दुपारी,
म्हणूनी जुनीच आता,
पायी वहाण आहे!
रुते कुणाला…..!

अंगठा विभक्त झाला,
तळवा फकस्त राहे,
हे चालणे बघा ना,
भलतेच मस्त आहे!
रुते कुणाला….!

फुटले नशीब आता,
ह्या दोन पावलांचे,
माझ्या जुन्या वहाणा,
ढापून चोर ‘जा’, ‘ये’!
(म्हणजे चोर माझ्या जुन्या
वाहाणा घालुन माझ्यासमोरुनच
‘ये-जा’ करतोय)
रुते कुणाला..!

हा ‘पायगुण’ माझा,
आहे असा करंटा,
नुकताच मंदिरी त्या,
बदलुन बूट राहे!
रुते कुणाला..!

कवी Unknown


Leave a comment

आहे बरेच काही सांगायला मला!!!

आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!

ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
झाला उशीर थोडा वाचायला मला

असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला?

का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला

भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!

हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला?

कवी Unknown


Leave a comment

ग्लोबलायझजेशन………..

ग्लोबलायझजेशन ग्लोबलायझजेशन
म्हणजे नेमक असत काय?

आमच्या गल्लीत त्यांची दुकाने
गावोगावी पिझ्झा आणि फ्रेंच फाय!
आणि दुसरे सांगा काय!

आमचा मळा, आमचा माळी
त्यात त्यांच्या द्राक्ष्यांची वेली
याहून दुसरे सांगा काय?

आमचे मास्तर त्यांच्या शाळा
त्यांचे दवाखाने आमचे डॉक्टर
याहून दुसरे सांगा काय?

त्यांच्या कंपन्या आमची माणसे
बिनभांडवली व्याज आपले
असा ऍडव्हांटेज दुसरे काय?

होंडामध्ये लताची गाणी,देशात चाले बिसलरीचे पाणी
भेटवस्तू मेड इन चायना
ग्लोबलायजेशन म्हणजे दुसरे काय?

जग म्हणजे एक लहान गाव
मात्र शेजाऱ्याचा नाही ठाव
हा नवा संवाद ग्लोबलाजेशन म्हणजे
आणखी काय!

कवी Unknown


Leave a comment

दिवसा स्वप्ने बघतो मी…

दिवसा स्वप्ने बघतो मी
रात्री जागत बसतो मी…

उगाच कविता करतो मी
जगात वेडा ठरतो मी…

मनात इमले रचतो मी
आशेवरती जगतो मी…

असतो तेथे नसतो मी
मलाच शोधत बसतो मी…

वरवर नुसते हसतो मी
‘अजब’ मनाशी कुढतो मी…

कवी Unknown