Creativity and Innovation

Just another WordPress.com weblog

ती सुंदर आहे म्हणून मी तिच्यावर प्रेम करत नाही

Leave a comment

ती सुंदर आहे म्हणून मी तिच्यावर प्रेम करत नाही

मी प्रेम करतो म्हणून ती सुंदर दिसते

ती माझ्यावर प्रेम करते

नाही नाही….

मी चांगला आहे म्हणून ती माझ्यावर प्रेम करत नाही

ती प्रेम करते म्हणून मी तिच्याकरता चांगला आहे

प्रेम हे बाह्य आवरणाचं नसतंच मुळी!

प्रेम हे देहाचं, संपत्तीचं, ऐहीकाचं नसतंच मुळी!

ते असतं ते केवळ आकर्षण !

होय…. ! हव्यास…. !

खरं प्रेम अंत:करणाचं असतं

आणि मनाने सुंदर असलेली माणसं भेटली

की प्रेमात आपसूकच पडायला होतं.

प्रेम म्हणजे काय नक्की !

प्रेम म्हणजे आपल्या मनात फुलणारं आनंदाचं गाणं

प्रेम म्हणजे विधात्याला पडलेलं

एक लोभसवाणं स्वप्न

प्रेम म्हणजे दरवळणार्या बागेमधील परिमल

प्रेमाला वस्तुमान नाही, प्रेमाला आकारमान नाही

प्रेमाला कोणतंच परिणाम नाही

प्रेम दिसत नाही, पण जाणवतं जरूर !

ती माझ्यावर असंच प्रेम करते, अगदी अस्सच….!

आणि मीही तिच्यावर !

खेळत असतो आम्ही दोघं

दोघांपैकी कुणीही जिंकलं

तरी हरतो आम्ही दोघंही !

चांदणं वितळावं तशी

सामावून जाते ती माझ्यात

अन् माझ्या रंध्रारंध्रात

उरत नाही तिचं आाणि माझं वेगळं अस्तित्व

महादेवाच्या पार्वतीसारखं

तिच्या संकोचातही असते सूचकता….!

आणि लज्जतेही असते निर्भयता….!

प्रेमाचे सारे पैलू अनुभवतो आम्ही

प्रेमाचा आवेग, बहर,

भांडण, रूसवा, अबोला

प्रेमातलं मौन आणि मौनातलं प्रेमही !

कधी कधी ती मौनाने बोलते सारं

मी प्राणांनी ऐकत जातो

ती टपटपते प्राजक्ताच्या सड्यासारखी

मी नजरेने वेचत जातो

ती रिमझिमते श्रावण होऊन

मी बेहोषीने भिजत जातो

कधी ती रूसते; मी रागावतो

ती एक कविता करते

ती हसते: मी ही हसतो

ती स्वत:च एक कविता होते

ती स्वत:च एक कविता होते !

कवी Unknown

Advertisements

Author: Ganesh

Ganesh Bhagat

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s