Creativity and Innovation

Just another WordPress.com weblog


Leave a comment

खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात …….

खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात

तुम्हाला काय,मला काय
सर्वांनाच पोरी आवडतात
जास्त जवळ जाऊ नका
कनाखाली ओढतात
खरच सांगतो पोरंनो,…………..
आज हा उदया तो
रोज नवा शोधतात
नुस्तच ठेउन वासावर
खीसा मात्र कापातात
खरच सांगतो पोरंनो,…………….
हा नडतो,तो भांडतो
दहा जन हनतात
पोरगी राहते बाजूला
पोरच भांडनात पडतात
खरच सांगतो पोरांनो,………………..
कधी इकडे,कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात
खरच सांगतो पोरांनो,………………..
याला फीरव,त्याला फीरव
दहा लपडयात अडक्तात
कधी धुन्दित,कधी मंदित
नको तस लूडकवतात
खरच सांगतो पोरांनो,……………….
कधी सेंट,कधी लिपस्टिक
नुस्तच पावडर थापतात
अन आपण मरला डोळा की
बापाला जाउन सांगतात
खरच सांगतो पोरांनो,………………..
कधी सिनेमा,कधी नाटक
नुस्ताच खीसा बघतात
अन खीसा खाली झाला की
दूसरा बकरा शोधतात
खरच सांगतो पोरांनो,पोरी महागात पडतात.

कवी Unknown


Leave a comment

ते गोड क्षण……..

ते गोड क्षण,
माझं हळवं मन;
तुझी अखंड बडबड,
आणि माझं नि:शब्द मौन.
तू कसं विसरु शकतेस?

तूझं मुग्धपणे हसणं,
हसताना मोहक दिसणं;
तुला डोळ्यात साठवताना,
माझं भान हरपणं.
तू कसं विसरु शकतेस?

तुझं ते अलगदपणे माझ्या मिठीत शिरणं,
घरची आठवण काढुन उगाच मुसमुसणं;
तुझ्या हळवेपणाला मझ्यात समावुन घेताना,
माझं तुझी समजुत काढणं.
तू कसं विसरु शकतेस?

आपलं ते चांदण्यांखाली जागणं,
तुटलेला तारा पाहुन तुझं देवाकडे काहितरी मागणं;
जन्म-जन्मांच्या साथीची आण घेताना,
तुझा हात माझ्या हातात गुंफणं.
तू कसं विसरु शकतेस?

माझं ते तुझ्यासाठीचं तळमळणं,
तुझ्या स्वप्नांसाठी निद्रेची आराधना करणं;
तरीही नेहमी तुझ्या विचारात गढुन,
माझं रात्र रात्र जागणं.
तू कसं विसरु शकतेस?

तू कसं विसरु शकतेस;
माझं प्रेम,
माझ्या भावना,
माझं मन,
माझ्या वेदना.
सांग, तू विसरु शकशिल का?

कवी Unknown


Leave a comment

चला सारे मिळूनीया आज जाऊ या गटारा

आली आखाडी आमूष्या

…. कोंबड्यांची काटाकूट
झाले गणगोत गोळा
…. बोकडांची ताटातूट

जरा तिखट फोडणी
…. द्या गरम रश्याला
अन कांद्याचा ठसका
…. जरा येउद्या घश्याला

चला जाऊ दुकाणात
…. पिऊन घ्या पोटभर
एक महीणा पुढचा
…. पुन्हा नाही घोटभर

नका मागे पुढे पाहू
…. घ्या अजुन गल्लास
नाही म्हणता होईल
…. माझा कलेजा खल्लास

एक एक घोटासाठी
…. नका लावू जादा वेळ
जरा जोसात रिचवा
…. नाही पोरांचा हा खेळ

मी चाललो डुलत
…. जसा चालला खटारा
चला सारे मिळूनीया
…. आज जाऊ या गटारा

कवी Unknown