Creativity and Innovation

Just another WordPress.com weblog

‘बाटा’ रुते कुणाला…

Leave a comment

‘बाटा’ रुते कुणाला,
आक्रंदतो इथे मी,
मज बूट हे रुतावे,
हा दैवयोग आहे!
(आहे वर तान घ्यावी,
नाहीतर बूट चावतो आहे
हे लक्षात कसे येणार?)
रुते कुणाला….!

सांगु कशी कुणाला,
कळ हाय अंगठ्याची,
हे बूट घालता मी,
अस्वस्थ फार आहे!
(आ.व.ता.घ्या.)
रुते कुणाला….!

चांभार हाय वैरी,
असतो कुठे दुपारी,
म्हणूनी जुनीच आता,
पायी वहाण आहे!
रुते कुणाला…..!

अंगठा विभक्त झाला,
तळवा फकस्त राहे,
हे चालणे बघा ना,
भलतेच मस्त आहे!
रुते कुणाला….!

फुटले नशीब आता,
ह्या दोन पावलांचे,
माझ्या जुन्या वहाणा,
ढापून चोर ‘जा’, ‘ये’!
(म्हणजे चोर माझ्या जुन्या
वाहाणा घालुन माझ्यासमोरुनच
‘ये-जा’ करतोय)
रुते कुणाला..!

हा ‘पायगुण’ माझा,
आहे असा करंटा,
नुकताच मंदिरी त्या,
बदलुन बूट राहे!
रुते कुणाला..!

कवी Unknown

Author: Ganesh

Ganesh Bhagat

Leave a comment